पब्जीला कमाईप्रकरणी टाकले मागे
जगभरात ऑनर ऑफ किंग्स मोबाईल गेम जानेवारी 2021 मधील सर्वाधिक कमाई करणारा गेम ठरला आहे. जानेवारी महिन्यात याची कमाई 267.3 दशलक्ष डॉलर्स राहिली आहे. टेनसेंट गेम्सने चीनमधून सुमारे 97 टक्के महसूल मिळविला तर थायलंडमधून 1 टक्के उत्पन्न प्राप्त केले आहे. जानेवारी 2020 च्या तुलनेत ऑनर ऑफ किंग्स गेमने 22 टक्क्यांची उत्पन्नवृद्धी नोंदविली आहे.
सर्वाधिक कमाई करणाऱया गेम्समध्ये पब्जी मोबाईल दुसऱया स्थानावर असून टेनसेंट कंपनीचाच हा ऍप आहे. त्याने 259 डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली आहे. पब्जी मोबाईलचा सुमारे 60 टक्के महसूल चीनमधून प्राप्त झाला आहे. याचा लोकल व्हर्जन गेम फॉर पीसच्या उत्पन्नात अमेरिकेचा वाटा 9.8 टक्के राहिला आहे.
यादीत सोनीचा ऍनिप्लेक्स तिसऱया तर रोबलॉक्स कॉर्पोरेशनचा रोबलॉक्स चौथ्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2021 च्या हायेस्ट ग्रॉसिंग मोबाईल गेम्सच्या पहिल्या 10 गेम्सच्या यादीत एक नवे नाव सामील झाले असून ते प्रोफेशन बेसबॉल स्पिरिट्स एचे आहे. या गेमने जानेवारीत 112.5 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे.
ऑनरल ऑफ किंग्स एक मल्टीप्लेयर ऑनलाईल बॅटल एरिया आहे. हा चीनमध्ये आयओएस आणि अँड्रॉईड मोबाइल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करण्यात आला आहे. चीनमध्ये हा गेम अत्यंत लोकप्रिय आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये या गेमचे 100 दशलक्षापेक्का अधिक दैनंदिन सक्रीय प्लेयर्स झाले हेते.