स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ऑनलाईन टीम / पुणे :
कष्टकरी, रोजंदारी मजूरांच्या कुटुंबियांच्या गरजेनुसार ऑनलाईन रक्कम दुकानदारास जमा करून मदत कार्य करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या राष्ट्रीय संयोजिका उषा बाजपेयी सातत्याने उपलब्ध करून देत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये भारतभर जास्तीत जास्त कुटुंबियांना मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न चालू ठेवणार असल्याचे बाजपेयी यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबीयांना रोजचे खाणेसुद्धा मुश्किल झाले आहे. यामध्ये अनेक कष्टकरी, रोजंदारी मजूर वर्गाचा समावेश आहे. त्यांच्यासाठी अन्नधान्य आणि जीवनोपयोगी वस्तू विकत घेण्याची मारामार झाली आहे. ‘स्टे अॅट होम’ आणि ‘सोशल डिस्टंसिंग’चा नियम पाळून हे मदतकार्य सुरु असून, सातत्याने मोबाईलवरून संपर्कात राहून अनेक स्वयंसेवी संस्था, नागरिक गरजू कुटुंबियांना त्यांची गरज पूर्ण करण्याचे काम चार दिवसांपासून सातत्याने करीत असल्याचे उषा बाजपेयी यांनी सांगितले.
यामध्ये पुणे शहरातील मुंढवा, पठारे वस्ती (हडपसर), वडगाव शेरी कामगार वस्ती, साळुंखे वस्ती, खळदकर वस्ती, जांभुळवस्ती, कुदळे वस्तींसारख्या अनेक वस्त्या तसेच सातारा सोलापूरसारख्या शहरांचा समावेश आहे. तसेच गरजूंना 9762111311 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.