दोघा जणांच्या बँक खात्यातील रक्कम हडप
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. सीईएन विभागाने जनजागृतीची मोहीम राबविली तरी फशी पडणाऱयांची संख्याही काही कमी नाही. मुतगा व हलगा येथील दोघा जणांच्या बँक खात्यातून रक्कम हडप करण्यात आली आहे.
मुतगा येथील उदय बस्सापूर यांचे एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून बँक खात्यातील 2 लाख 215 रुपये भामटय़ांनी हडपले आहेत. यासंबंधी बुधवारी सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाली असून पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.
तर हलगा येथील एका रहिवाशाच्या बँक खात्यातून 2 लाख 83 हजार रुपये हडप करण्यात आले आहेत. पेडिट कार्ड मेंटेनन्सच्या नावाने ओटीपी व एटीएम कार्डवरील माहिती मिळवून भामटय़ांनी मोठी रक्कम हडप केली असून सीईएन पोलीस स्थानकात या घटनेचीही नोंद झाली आहे.
सायबर क्राईम विभागावर ताण ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढते आहेत. त्यामुळे साहजिकच सायबर क्राईम विभागावरील ताणही वाढला आहे. कारण बेळगाव पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात एक व पोलीसप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात एक अशी दोनच सायबर क्राईम पोलीस स्थानके आहेत. त्यामुळे साहजिकच सायबर क्राईम विभागावरील ताण वाढत चालला आहे.