वृत्तसंस्था/ पॅरीस
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जपानचा टेनिसपटू बेनोई पेअरवर प्रेंच टेनिस फेडरेशनने बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
जागतिक पुरुष टेनिसपटूंच्या क्रमवारीत 35 व्या स्थानावर असलेल्या पेअरने टेनिस स्पर्धेत खेळताना मैदानावर वारंवार बेशिस्त वर्तनाचे दर्शन घडविल्याने त्याची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या निवडीकरिता विचार केला जाणार नाही, असे प्रेंच टेनिस फेडरेशनचे नवे तांत्रिक संचालक इस्क्युडे यांनी सांगितले. ब्युनोस आयरिस येथे झालेल्या स्पर्धेमध्ये पेअरने बेशिस्त वर्तन केल्याबद्दल त्याला दंड करण्यात आला होता. टेनिस कोर्टवर खेळताना संतप्त होऊन थुंकल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.