वृत्तसंस्था/ मेलबर्न
पाचवेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱया रशियाच्या मारिया शरापोव्हाला ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश मिळाला आहे. मागील वर्षी तिला दुखापतीचा वारंवार त्रास झाल्याने तिला फारसे यश मिळविता आले नव्हते.
32 वर्षीय शरापोव्हाने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. महिलांच्या मानांकनात ती सध्या 147 स्थानावर घसरली असून ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीत तिला पराभवाचा धक्का बसला होता. 2003 मध्ये तिने या स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर 16 व्या वेळी ती यात सहभागी हाणार आहे.