वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरू असलेल्या एटीपी चषक पुरूषांच्या सांघिक टेनिस स्पर्धेत सोमवारी ब गटातील झालेल्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाने इटलीचा 2-1 असा पराभव पेंला. या लढतीत सुरूवातीला ऑस्ट्रेलिया पिछाडीवर होता. आता या स्पर्धेत मंगळवारी ऑस्ट्रेलियाची लढत विद्यमान विजेत्या रशियाबरोबर तर इटलीचा सामना फ्रान्सबरोबर होणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इटली यांच्यातील या लढतीत पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि सेव्हेली यांनी दुहेरीच्या सामन्यात इटलीच्या बेरेटेनी आणि बोलेली यांचा 6-3, 7-5 असा पराभव करत आपल्या संघाला निसटता विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या मिनॉरने दुसऱया एकेरी सामन्यात इटलीच्या बेरेटेनीवर 6-3, 7-6 (7-4) अशी मात केली. ऑस्ट्रेलियाच्या पियर्स आणि सेव्हेली या जोडीने दुहेरीचा सामना 84 मिनिटात जिंकला. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरने ऑस्ट्रेलियाच्या प्युरसेलचा 6-1, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करून ऑस्ट्रेलियावर आघाडी मिळविली होती. एटीपी चषक सांघिक स्पर्धेमध्ये प्रत्येक लढतीत एकेरीचे दोन सामने, त्यानंतर दुहेरीचा एक सामना खेळविला जात आहे.