वृत्तसंस्था/ पणजी
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया एफसी गोवा फुटबॉल संघाने ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू जेम्स डोनाची याच्याबरोबर एक वर्षांसाठी करार केला आहे.
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या आगामी हंगामात डोनाचे एफसी गोवा संघाकडून खेळणार आहे. 27 वर्षीय डोनाची हा यापूर्वी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन रोअर संघाचे प्रतिनिधीत्व करत होता. त्याने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर ब्रिस्बेन रोअर क्लबला दोन स्पर्धा जिंकून दिल्या होत्या. डोनाची याच्या सहभागामुळे एफसी गोवा संघ आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास या क्लबचे संचालक रवि पुष्कर यांनी व्यक्त केला.