वृत्तसंस्था / मेलबोर्न
कोरोना महामारी संकटामुळे ऑस्ट्रेलियातील सर्व क्रीडास्पर्धा तब्बल चार महिन्याच्या कालावधीत स्थगित करण्यात आल्या होत्या. आता 17 जुलैपासून ऑस्ट्रेलिया फुटबॉल फेडरेशनने ऑस्ट्रेलियन ए लीग फुटबॉल स्पर्धेला पुन्हा प्रारंभ करत असल्याची घोषणा सोमवारी केली.
कोरोना समस्येमुळे पश्चिम सिडनीमधील एका संकुलात मेलबोर्नच्या तीन संघातील फुटबॉलपटूंना क्वारन्टाईनसाठी ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात ए लीग फुटबॉल स्पर्धा येत्या गुरूवारपासून सुरू करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मेलबोर्न व्हिक्टरी आणि वेस्टर्न युनायटेड यांच्यात हा सामना खेळविला जाणार होता पण मेलबोर्नमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या शुक्रवारी मेलबोर्नच्या ज्युबिली स्टेडियमवर सिडनी एफसी आणि वेलिंग्टन फिनिक्स यांच्यात सामना खेळविला जाईल.