नवी दिल्ली
सरकारी कंपनी ओएनजीसीचा डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा 8 हजार 764 कोटी रुपयांवर राहिला असून सदरच्या कंपनीच्या समभागाने शेअर बाजारात गुंतवणूकदारांना वर्षभरात 73 टक्के परतावा दिला आहे.ओएनजीसीने आपल्या नफ्यात सातपट वाढ दर्शवली आहे. एक वर्षापूर्वे समान अवधीत कंपनीने 1 हजार 258 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.