तेल कंपनीकडून 1.5 टक्के हिस्सेदारीची विक्री
नवी दिल्ली
देशातील दिग्गज तेल आणि गॅस उत्पादक कंपनी ऑईल ऍण्ड नॅचरल गॅस कॉर्पेरेशन (ओएनजीसी) मधील सरकार आपली हिस्सेदारी विकणार असल्याची माहिती आहे. यामधील जवळपास 1.5 टक्के हिस्सेदारी विकत जवळपास 3,000 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती ओएनजीसी कंपनीने शेअर बाजाराला नुकतीच दिली आहे.
या खरेदीसाठी कंपनीचा ऑफर फॉर सेल (ओएफएस ) 30 मार्चला खुला झाला असून 31 मार्चपर्यंत खुला राहणार आहे. उपलब्ध माहितीनुसार भारत सरकारची ओएनजीसी लिमिटेडमध्ये 60.41 टक्के हिस्सेदारी आहे.
सदरच्या ऑफरमध्ये 94,352,094 समभाग म्हणजे 0.75 टक्के इक्विटी हिस्सेदारीची ऑफर आहे. नॉन रिटेल इन्वेस्टर्स 30 मार्च रोजी सबस्क्राईब करणार आहेत. 31 मार्च रोजी रिटेल इन्वेस्टर्ससाठी सबास्क्रिप्शन राहणार आहे. यात फ्लोर प्राईस 159 रुपये प्रति समभागांपर्यंत निश्चित होणार आहे. मंगळवारी ओएनजीसीच्या 171.05 रुपये स्टॉक क्लोजिंग किमतीच्या 7 टक्के सवलतीत या किमती राहणार आहेत.
25 टक्के समभाग आरक्षित
ओएफएसमध्ये कमीत कमी 25 टक्के समभाग म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांसाठी आरक्षित असल्याचे सांगण्यात येते.