आयआटीआय पारिसरात पाहिला रूग्ण, महापालिका आरोग्य यंत्रणेकडून संपका&तील व्यक्ताRचा शोध
प्रतिनिधी / कोल्हापूर
जगभरात धुमाकुळ घातलेल्या ओमिक्रोनची कोल्हापुरात एंट्री झाली आहे. आयटीआय पारिसरात पाहिला रूग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. येथील चार्टड अकाऊंटंट कुटूंब प्रमुख असलेल्या चार व्यक्ती कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यारव उपचार सुरू होते. ओमिक्रोनच्या तपासणीसाठी त्यांचे स्वॉब पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यांच्यापैकी एकाच अहवाल पॉझिटीव्ह आला. महापालिकेकडून त्यांच्या संपका&तील लोकांचा शोध सुरू आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रोनचा जगभरात धोका निर्माण झाला आहे. कोल्हापुरातही परदेशातुन आलेल्यांपैकी काहींना कोरोना झाल्याने त्यांचे स्वॅब पुण्याला तपासणीसाठी देण्यात येत आहेत. अशाच प्रकारे आयटीआय पारिसरातील एका कुटूंबातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना तिघांचे स्वॅब ओमिक्रोनच्या तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. बुधवारी दुपारी त्यांचे अहवाल आरोग्य प्रशासनाला मिळाले. यामध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. आयटीआय पारिसरातील त्यांच्या संपका&तील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.