वृत्तसंस्था/ लॉस एंजेलीस
चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया जपानच्या नाओमी ओसाकाने दोन महिन्यांच्या खंडानंतर विजयी पुनरागमन केले. तिने डब्ल्यूटीए सॅन जोस हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत चीनच्या झेंग किनवेनचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
ओसाकाने 19 वर्षीय किनवेनवर 6-4, 3-6, 6-1 अशी मात केली. पेंच ओपन ग्रँडस्लॅममध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानंतर दुखापतीमुळे तिला दोन महिने टेनिसपासून दूर रहावे लागले होते. अन्य एका सामन्यात विम्बल्डन चॅम्पियन इलेना रिबाकिनाला पहिल्याच फेरीत दारिया कॅसात्किनाकडून पराभवाचा धक्का बसला.