उपग्रहाच्या मदतीने मासळी शोधणारे ऍप विकसित : ग्राहकांनाही मिळणार पकडलेल्या मासळीची माहिती
प्रतिनिधी / रत्नागिरी
समुदामधील मासळीचा अचूक वेध घेण्यासाठी मोबाईल ऍपची निर्मिती करण्यात आली आह़े समुद्रात मुबलक प्रमाणात मासळी असणारी जागा उपग्रहाच्या माध्यमातून अचूकपणे शोधणे यामुळे शक्य येणार आह़े या ऍपमुळे ग्राहकांनाही मासळी कोणी व केव्हा पकडली, याची माहिती एका क्लिकवर मिळणार आह़े न्युमर 8 या समुहाने हे ऍप तयार केले असून या ऍपचे नामकरण ‘ओ फिश’ असे करण्यात आले आह़े
ऍप वापरणाऱया मच्छीमारांना बंदरानजीक माशांच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळाल्याने त्यांच्या वेळ व इंधनाची बचत होणार आह़े समुद्रामध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजन पातळी जास्त असते, त्या ठिकाणी मासळी मुबलक प्रमाणामध्ये आढळून येत़े या मासळींचा अचूक शोध उपग्रहाच्या मदतीने या ऍपवर दिसणार आह़े यामुळे मच्छीमारांना कमी वेळ व खर्चामध्ये अधिक मासळी मिळणार आह़े
ऍप निर्मिती करणारा न्यूमेर 8 समुह मुंबईची भौगोलिक माहिती व नैसर्गिक आपत्तीविषयक अहवालावर काम करत असताना मच्छीमारांसाठी उपयुक्त असणाऱया या ऍपची कल्पना सूचली. न्यूमेर 8 संघाने किनारपट्टीवरील पुराचा त्रास सहन करणाऱया व इतर समस्यांशी झगडणाऱया मच्छीमारांशी या बाबत बोलण्यास सुरूवात केली. न्यूमेर 8 समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक देवलीना भट्टाचार्य म्हणाल्या की, कृषी तंत्रज्ञानाच्या देशेने अभ्यास करताना मच्छीमारी क्षेत्रातील समस्याकडे लक्ष दिले गेलेले नाह़ी परंतु जीआयएसच्या (भौगोलिक माहिती प्रणाली) माध्यमातून या समस्यावर मोठय़ा प्रमाणात माहिती मिळत असून मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यात येवू शकतात़ देवलानी भट्टाचार्य यांनी उद्योजक होण्यापूर्वी भारत, युरोप व अमेरिकेच्या अनेक संस्थांमध्ये डेटा वैज्ञानिक म्हणून काम केले आह़े
या ऍपच्या माध्यमातून मच्छीमारीसाठी बंदर निवडल्यानंतर त्या बंदरानजीक मासळी मोठय़ा प्रमाणात असणारी जागा अचूकपणे ऍपच्या माध्यमातून दर्शवण्यात येत़े मासळी पकडण्यासाठी समुद्रात जाताना नेटवर्क कनेक्टिव्हिटी गमावली तरीही मासळी उपलब्ध असलेल्या ठिकाणांचा अंदाज येत असल्याची माहिती या ऍपच्या वापरकर्त्या मच्छीमारांनी दिल़ी पूर्वी खोल समुद्रामध्ये मासळीचा ठाव घेण्यासाठी दिवस खर्ची पडायचा. मात्र या ऍपमुळे तुलनेने कमी वेळ लागत असल्याचे मछीमारांनी सांगितल़े
दलालांकडून होणारी लूट थांबवण्यात मदत
न्यूमेर 8 हे ऍप सहज मोबाईल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आह़े रिटेल, निर्यातदार व मासळी खरेदी करणाऱया ग्राहकांसाठी मासळीची खरेदी-विक्री सोपी झाली आह़े मच्छीमारांच्या खर्चात घट होत आह़े दलालांचे टप्पे कमी झाल्यामुळे ग्राहकांना कमी दरात दर्जेदार मासळी मिळत आहे. मच्छीमारांची दलालांकडून होणारी लूट थांबवण्यात मदत होत आह़े
या ऍपवर नोंदणीकृत मच्छीमारांची नोंद ठेवता येत आहे. यामुळे ग्राहकांना कोणी, कधी व केव्हा मासळी पकडली आहे, याची संपूर्ण माहिती पॅकेजवरील क्यूआर कोडद्वारे मिळणार आह़े या ऍपमुळे मच्छीमारांकडून ताजी मासळी खरेदी करणाऱया ग्राहकांना थेट मासे विक्रीसाठी मुंबईकडे इन्सुलेटेड वाहनाद्वारे पाठवण्यास सुरूवात केली. त्यासाठी एक व्हॉट्सऍप ग्रुपही तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून हे मासे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत़
मच्छीमारांसाठी उपयुक्त ऍप
या ऍपमुळे समुद्रामधील सर्वाधिक मासळीची ठिकाणे समजण्यात मदत होत आहे. मागणी असलेली मासळीही या ऍपच्या मदतीने मिळत असल्याचे मच्छीमार धिरज धातकर यांनी सांगितल़े