ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात आज पुन्हा कोरोनाचे 59 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार पार गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मध्ये सोमवारी सकाळी 59 रुग्ण नवे आढळले. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांची एकूण 1 हजार 21 झाली आहे. औरंगाबादच्या विविध एकवीस भागात नव्याने रुग्ण सापडले आहेत. आज सापडलेल्या 59 रुग्णांमध्ये 27 महिला आणि 32 पुरुषांचा समावेश आहे.
औरंगाबाद मध्ये पहिला रुग्ण 15 मार्च रोजी सापडला होता. मात्र, गेल्या महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने फैलावत आहे. हा आकडा एक हजारच्या पुढे पोहचला आहे. तर आता पर्यंत 312 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या कोविड केअर सेंटर मधून 180, जिल्हा सामान्य रुग्णालयातून 112 तर शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील वीस रुग्ण बरे झाले आहेत, जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.