वाढीसोबत 1.83 लाख कोटी रुपयावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाची औषध निर्यात मागील आर्थिक वर्षात 2021-22 च्या दरम्यान 1,83,422 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. हाच आकडा आर्थिक वर्ष 2013-14 च्या दरम्यान औषध निर्यात 90,415 कोटी रुपये होती, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविड महामारीशी संबंधीत औषधांची मागणी घटल्याने आणि जागतिक व्यापारात अडचणी निर्माण झाल्याने 2021-22 मध्ये औषध निर्यातीत सकारात्मक वृद्धी झाल्याची नोंद केली होती.
भारतीय कंपन्यांची कामगिरी
भारतीय कपंन्यांनी आपल्या मूळ प्रतिस्पर्धी आणि उत्तम गुणवत्तेच्या मदतीने जागतिक बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. जगामध्ये 60 टक्के व्हॅक्सीन आणि 20 टक्के जेनरिक औषध भारतामधून निर्यात करण्यात आल्याची माहिती आहे.औषध उत्पादनांमध्ये भारत जगात तिसरा स्थानी राहिला आहे. औषध उद्योगाची उलाढाल 50 अब्ज डॉलसंवर राहिली आहे.