वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
चव्हाट गल्लीतील श्री बाल संभाजी युवक मंडळ व ग्रामस्थांतर्फे दुर्गामाता दौड व विजयादशमीचे औचित्य साधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देऊन स्फूर्तिदायी व शिवमय वातावरण तयार करण्यात आले.
यावेळी ऍड. सुधीर चव्हाण, ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, सदस्य जयराम पाटील, उमेश पाटील आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
फर्निचर कंत्राटदार विश्वनाथ पाटील व इलेक्ट्रिकल कंत्राटदार जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. पुतळा श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या पश्चिमेकडील खुल्या जागेवर उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
पुतळा उभारणीसाठी मिळालेल्या देणग्या. विश्वनाथ भाऊराव पाटील 51,000 रुपये, भाऊराव कल्लाप्पा पाटील 11,000 रुपये, कृष्णा बाळू पाटील, गंगाराम रामा पुजारी, मारुती यल्लाप्पा पाटील प्रत्येकी 5000 रुपये. यावेळी श्री बाल संभाजी युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार बसवंत पाटील यांनी मानले.