कंग्राळी बुद्रुक : येथील नेताजी गल्लीतील राहत्या घराची भिंत पावसामुळे कोसळून सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भिंत बाहेरच्या बाजूला पडल्यामुळे सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. परंतु, भिंत कोसळल्यामुळे त्यांचा संसार उघडय़ावर पडला आहे. नागेश शट्टू जाधव असे नुकसानग्रस्त घरमालकाचे नाव आहे. शनिवारी परतीच्या पावसाचा जोरदार मारा झाला. पावसाने थोडी उसंत घेतल्याने रात्री सर्वजण झोपी गेले. रात्री 12.15 वाजता अचानक मोठा आवाज झाला. जाधव कुटुंबीय जागे होऊन पाहतात तर त्यांच्याच राहत्या घराची एका बाजूची भिंत कोसळल्याचे दिसून आले. भिंत घराच्या बाहेरील बाजूला पडल्यामुळे सुदैवाने कुणाला दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, जाधव कुटुंबियांचा संसार उघडय़ावर पडला आहे. ग्राम पंचायत, वरि÷ अधिकारी व तलाठी यांनी घराची पाहणी करून नुकसानग्रस्ताला अधिकाधिक भरपाई मंजूर करून देण्याची मागणी करण्यात येत आहे..
Previous Articleबी. आय. पाटील यांना वाघवडे येथे श्रद्धांजली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.