प्रतिनिधी / बेळगाव
कंग्राळ गल्ली येथील एकता महिला मंडळ व डॉ. रवि पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हाडांमधील दोष यांची तपासणी करून शिबिरार्थिंना सल्ला देण्यात आला. डॉ. रवि पाटील, डॉ. सुमीथा रुतुंजी, डॉ. सुनील गिडमुडी, डॉ. पवन अकुंके यांनी गल्लीतील ज्ये÷ नागरिकांची तपासणी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपा दरवंदर होत्या. एकता महिला मंडळाच्यावतीने सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्या सरनोबत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. रवि पाटील यांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरातील तपासणीसाठी पल्लवी कोलकार, संजना हरिचे, भारती पाटील, रूपा पुजारी, अंकिता बिजगर्णीकर, सय्यद, अमोल हुंचीकट्टी, रितेश सावंत, राजेश होलकर, महेश मंडू, लक्काप्पा करडीगुद्दी यांनी साहाय्य केले. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी उपक्रमाबद्दल डॉ. रवि पाटील यांचे आभार मानले. यावेळी एन. डी. जाधव, अशोक कंग्राळकर यासह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.