सॅनिटायझेशनला प्रारंभ : नागरिकांमध्ये भितीचे वातावरण : खबरदारी घेण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसे प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरूवात केली. सध्या विश्वेश्वरय्या नगर व अनगोळ हे दोन भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
प्रशासनाने या ठिकाणी सॅनिटायझेशन करून बॅरिकेड्स घालण्यास सुरूवात केली आहे. कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्याबरोबर नागरिकांमध्ये मात्र भितीचे वातावरण पसरले आहे. हे प्रमाण अधिक वाढू नये यासाठी नागरिकांनी मात्र खबरदारी घेणे गरजेचे आहे.