अध्यक्ष नागेंद्र राव यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
दि इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेपेटरी ऑफ इंडिया संस्थेच्या बेळगाव शाखेतर्फे अधिकाधिक विद्यार्थी या अभ्यासक्रमाला यावेत यासाठी ग्रामीण भागात जागृती केली जाणार आहे. स्वतःमधील कौशल्याला व्यवसायाची जोड देण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. आतापर्यंत बेळगावमध्ये 1873 विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्याची माहिती दि इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेपेटरी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नागेंद्र राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. कंपनी सेपेटरी या क्षेत्रामध्ये येणाऱयांची संख्या वाढली आहे. परदेशात कंपनी सेपेटरी पदासाठी उत्तम संधी आहेत. देशातही अनेक कंपन्यांमध्ये कंपनी सेपेटरी महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. त्यामुळेच या क्षेत्राकडे वळणाऱयांची संख्या वाढली आहे. देशभरात एकूण 72 विभाग असून, त्यामधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाते. लॉकडाऊनमध्ये वेबिनारच्या माध्यमातून प्रशिक्षण व विविध कार्यक्रम सुरू ठेवल्याची माहिती देवेंद्र देशपांडे यांनी दिली. प्रथमच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कर्नाटकचे नागेंद्र राव यांची निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी देवेंद्र देशपांडे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल बेळगाव संघटनेच्यावतीने या दोघांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रोफेशनल डेव्हल्पमेंट कार्यक्रम विद्यार्थी वर्गासाठी आयोजित करण्यात आल्याची माहिती बेळगाव विभागाच्या प्रमुख पवित्रा व्यास यांनी दिली.