वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तेल उत्पादक देशांची संघटना आणि त्याच्या सोबत उत्पादनात कपात करण्यासाठी विविध देशांनी सहमती दर्शविली आहे. याचा परिणाम म्हणून सोमवारी विमान व तेल व्यापारी कंपन्यांचे समभाग सोमवारी घसरले आहेत. यामध्ये स्पाईस जेटचे समभाग 4.90 टक्क्यांनी घसरून 44.60 वर आला आहे. यासह इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एविएशनचे समभाग 4.75 टक्क्यांनी घसरून 190 रुपयावर आली आहे. तर दुसऱया बाजुला तेल व्यापारी कंपन्यांमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये 3.87 टक्क्यांनी घसरून 199.85 रुपयावर पोहोचले. भारत पेट्रोलियमचे समभाग 2.52 टक्क्यांनी घसरून 336.35 रुपयांवर आणि इंडिया ऑईल कॉर्पोरेशनचे समभाग दोन टक्क्यांनी खाली येत 81.70 रुपयावर आले आहेत.