छत्रू महाराज भवन, बसवाण्णानगर येथे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
36 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 10 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदनगरी येथील छत्रू महाराज भवन, बसवाण्णानगर येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अशोका कन्स्ट्रक्शनचे अशोक नाईक यांच्या हस्ते होणार आहे. स्वामी विवेकानंदनगरीचे उद्घाटन गणपत नागाप्पा पाटील यांच्या हस्ते, संमेलन व्यासपीठाचे उद्घाटन महेश होनगेकर यांच्या हस्ते, ग्रंथदालनाचे उद्घाटन लक्ष्मण भैरू पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
लक्ष्मण सामजी पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे, रुक्मिणी निलजकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे, पी. आर. पाटील यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे, ऍड. शाम पाटील यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर प्रतिमेचे, पी. आर. पाटील यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन होणार आहे. उमेश देसाई यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. ह.भ.प. अप्पय्या पावनोजी यांच्या हस्ते पालखी व ग्रंथपूजन होणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून लेखिका प्रा. माधुरी शानभाग उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता कवी संमेलन होणार आहे. कलमेश्वर को-ऑप. पेडिट सोसायटी-कंग्राळी बुद्रुक, मराठा को-ऑप बँक, नवहिंद को-ऑप. सोसायटी, श्री राम सोसायटी यांनी अध्यक्षीय भाषण व कवी संमेलन पुरस्कृत केले आहे.