नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
कणकवली / वार्ताहर-
महामार्ग चौपदरीकरण कामातील हलगर्जीपणा व परिणामी निर्माण होत असलेली धोकादायक स्थिती पुन्हा एकदा दिसून आली आहे. कणकवली शहरातून जात असलेल्याउड्डाणपुलावरील गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या `लेन’वरील रस्ता खचला असून त्यावर सिमेंटची मलमपट्टी करण्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरु होते. याबाबत शहर व परिसरातील नागरिकांनी दुपारच्या सुमारास रस्ता खचलेल्या ठिकाणी धाव घेतली. जोपर्यंत रस्ता सुस्थितीत आणला जात नाहि, तोपर्यंत या ‘लेन’वरील वाहतूक बंद ठेवावी, अशी भूमिका उपस्थित संजय मालंडकर, बाळू मेस्त्री आदींनी घेतली. अर्थातच नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजल्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक जसमुद्दीन मुल्ला, महामार्ग विभागाचे सहाय्यक निरीक्षक अरूण जाधव आदी घटनास्थळी दाखल झाले होते.