गोकुळ शिरगाव / प्रतिनिधी
पुणे-बेंगलोर महामार्गावर आज सायंकाळी कणेरीवाडी फाट्याजवळ झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी हद्दीमध्ये हॉटेल वैभवच्या समोर अज्ञात वाहानाची मोटरसायकलला धडक बसून बुधवारी संध्याकाळी पाचच्यासुमारास झालेल्या अपघातामध्ये अर्जुन भीमराव लोखंडे (वय 27) कोतवाल नगर, कोल्हापूर हा जखमी झाला आहे. तर नूर मोहम्मद गुलाब मोहम्मद खुदुस राहणार मनेर मळा उंचगाव (वय वर्षे 20) मूळ राहणार आसाम राज्यातील असून सध्या राहणार मयत झाला आहे, जखमीला सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठीघेऊन गेले असून या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. आधिक तपास सपोनि रविकांत गच्चे करीत आहेत.