दक्षिणेसह बॉलिवूडमध्येही सक्रीय रकुलप्रीत सिंग
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने ‘यारियां’ चित्रपटामधून 214 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने रकुलने 4 वर्षांचा गॅप घेतला. यादरम्यान ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसून आली. दक्षिणेसह बॉलिवूडपटांमध्ये काम करताना भाषेबद्दल कधीच विचार करत नाही. अभिनयाला कुठलीच सीमा नसते. मला आता अनेक कमर्शियल चित्रपट करायचे आहेत. बॉलिवूडमध्ये अद्याप चांगल्याप्रकारे नाच-गाणी करणे शिल्लक असल्याचे रकुलने म्हटले आहे.
दक्षिण तसेच बॉलिवूड दोन्ही ठिकाणी संतुलन राखायचे आहे. पूर्ण जीवन जर संतुलित असेल तर तुम्ही एका दिवसात बरेच काही करू शकता असे तिने सांगितले आहे. रकुल यापूर्वी अजय देवगणसोबतच्या ‘दे दे प्यार दे’ चित्रपटात दिसून आली होती.
एखाद्याची प्रतिभाच त्याला यश मिळवून देत असते. जर तुम्ही कष्टाळू आणि प्रतिभावंत असाल तर लोक तुम्हाला ऑफर देतील. संपर्क किंवा ओळख असल्यास तुम्हाला मदत मिळू शकते पण पसंत किंवा नापसंत करण्याचा निर्णय लोकांच्या हातात असतो असे ती म्हणते. रकुलचे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. तर दोन चित्रपटांचे चित्रिकरण सुरू होणार आहे.