जिह्यात कोरोनाचे 73 नवे रूग्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाचे 73 नवे रूग्ण मिळून आले आहेत़ रूग्णसंख्या कमी आढळून येण्यामागे कमी प्रमाणात होणाऱया चाचण्यांची संख्या असल्याचे दिसत आह़े जिल्हाधिकारी ड़ॉ ब़ी एऩ पाटील यांनी पदभार स्वीकारताच †िदवसाला 10 हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवले होत़े मात्र निम्म्याही चाचण्या होत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आह़े
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कोरोनाच्या 3 हजार 39 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 1 हजार 57 चाचण्यांपैकी 34 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 982 पैकी 39 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळल़े यामध्ये मंडणगड-3, दापोली-9, खेड-3, गुहागर-13, चिपळूण-15, संगमेश्वर-4, रत्नागिरी-19, लांजा-2 तर राजापूर-5 असे तालुकानिहाय रूग्ण सापडले. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 77 हजार 751 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 3.22 इतका आह़े
शुक्रवारी चिपळूण येथील 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 30 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 74 हजार 489 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.99 इतके आह़े तर 701 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 241 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़