चुये / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतील सरपंच उपसरपंच निवडी. जिल्हाधिकारी यांनी अध्यादेश काढला असुन संबंधीत ग्रामपचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडी. नऊ फेबुवारीला होणार आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांच्या सभाग्रह प्रवेशाचा यानिमिताने मार्ग मोकळा झाला आहे.
तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या वातावरणात पार पडल्या होत्या. पक्षा पेक्षा स्थानिक आघाडीचे राजकारण ,सत्तेसाठी केलेल्या तडजोडी या मुळे तालुक्यातील राजकीय वातारणात चांगलेच ढवळून निघाले होते. निकालानंतर सरपंच आरक्षण जाहीर झाले त्यामुळे सरपंच उपसरपंच निवडी कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागलीहोती.
त्या प्रमाणे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी करवीर मधील सरपंच उपसरपंच निवडीचा आदेश दिल्यामूळे नऊ फेबुवरी रोजी निवडी होणार आहेत. त्या साठी नव्या सभागृहाची पहिली सभा त्या दिवशी होऊन सभेत फक्त निवडीचा विषय होणार आहे. प्राधिकृत निडणुक अधिकारी यांचे अधक्ष्य ते खाली निवडी होणार आहेत.