ऑनलाईन टीम / कराची :
पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीत कट्टरपंथीयांकडून मंदिरे आणि देवतांची तोडफोड करण्यात आली. हिंदू धर्मीयांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
हिंदू मुलावर मोहम्मद पैगंबरांच्या विटंबनेचा आरोप करत कट्टरपंथीयांकडून हिंदूंची मंदिरे आणि देवतांची तोडफोड करण्यात आली आहे. कट्टरपंथीयांकडे यासंदर्भात कोणताही पुरावा नाही. तरी देखील खोटे आरोप करून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप स्थानिक हिंदूंनी केला आहे.
मागील 20 दिवसांत पाकिस्तानात हिंदूंच्या मंदिरावर 3 वेळा हल्ले झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही.