जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची कारवाई
प्रतिनिधी/ कराड
मलकापूर ता. कराड येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार अमिर फारूख शेख (वय 29) याला एक वर्षांसाठी सातारा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली. पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी मंजूरी दिली आहे. शेख याच्यावर खूनाचा प्रयत्न, मारामारी,सशस्त्र दहशत माजवण्यासह इतर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार
अमीर फारुख शेख याच्या विरुद्ध स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी.आर.पाटील यांनी सादर केलेला होता. स्थानिक गुन्हे शाखेने पडताळणी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधिक्षक
धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेला होता.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रस्तावाची पाहणी केली. अमिर शेखकडून खूनाचा प्रयत्न
करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत करणे व सार्वजनिक
शांततेस बाधा उत्पन्न होत असल्याची कृत्ये होत असल्याने त्यास 1
वर्षाकरीता स्थानबद्ध करण्याच्या प्रस्तावाचे आदेश काढले आहेत. त्याला 1 वर्षा
करीता सातारा जिल्हा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आलेले आहे.
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, अशोक थोरात, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी.आर.पाटील,विजय गोडसे, स हवालदार प्रविण शिंदे, विजय कांबळे, प्रमोद सावंत, नितीन येळवे, संजय जाधव, सचिन साळुखे, प्रफुल्ल गाडे, विनोद माने, मारुती लाटणे यांनी
कारवाई करणेसाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.