कराड / प्रतिनिधी
कराड तालुक्यातील पाचवड फाटा परिसरात पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या अपघातात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातील एका वाहन पुण्याच्या कात्रज भागातील पैलवानांचे असल्याचे समोर येत असल्याने खळबळ उडाली होती.
दरम्यान अपघातात पोलिसांकडून जखमींना मदत करण्यासाठी धावपळ सुरू होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरवरून इनोव्हा कार व स्विफ्ट डिझायर कार पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. कराड तालुक्यातील पाचवड फाटा परिसरातील प्रणव वाईन शॉपसमोर आल्यावर दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांची एकमेकाला धडक बसल्याने वाहनांचा चक्काचूर झाला होता.
अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती.