नवी दिल्ली : भारताचा व किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा फलंदाज करुण नायरला गेल्या महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. यातून तो आता पूर्ण बरा झाला असून तो आता संघासमवेत संयुक्त अरब अमिरातला रवाना होण्यास सज्ज झाला आहे.
एका क्रीडा वेबसाईटने सांगितले की, नायर दोन आठवडय़ाहून अधिक काळ स्वविलगीकरणात गेला होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या चाचणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच्या प्रँचायजीने या संदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. पण बीसीसीआयच्या सूत्राने 8 ऑगस्ट रोजी क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर नायरचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे सांगितले. त्याला आता संघातील इतर खेळाडूंप्रमाणे आणखी तीन चाचण्या करून घ्याव्या लागणार असून त्यानंतरच तो संघासमवेत 20 ऑगस्ट रोजी दुबईला प्रयाण करू शकणार आहे.