प्रतिनिधी / विजापूर
कर्तव्य बजावत असताना अग्निशमन दलाचा जवान श्रीशैल बिरादार (वय 36) हा मरण पावल्याची घटना आज घडली. जिल्हय़ातील इंडी शहरातील अग्निशमन दलाच्या स्टेशनमध्ये श्रीशैल बिरादार हा सेवा बजावत होता. आज नेहमीप्रमाणे तो डय़ुटीवर रूजू झाला. अचानक सकाळी 11 च्या सुमारास त्याच्या छातीत दुखू लागले. जवळ उभ्या असलेल्या त्याच्या सहकाऱयांनी त्याला पाणी पाजले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समजले. श्रीशैल हा जिल्हय़ातील लचाण गावचा रहिवासी आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे.