बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.या पार्श्वभूमीवर बेंगळूर येथे आयोजित कार्यक्रमात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वनाथनारायण सी. एन. यांच्या हस्ते गुरुवारी कोरोना प्रसार कमी करण्याच्या उद्देशाने आठ उत्पादने बाजारात आणली. राज्यात गुरुवारी सहा हजाराहून अधिक नवीन रुग्णांची भर पडली आहे .
बाजारात आणलेली उत्पादने विविध स्टार्टअप्सद्वारे विकसित केली आहेत, यामध्ये रोग प्रतिकारशक्ती-बूस्टर चपाती, चहा, एक ड्रॉप, फळ, एक टॅब्लेट, केंद्रीकृत आरोग्य देखरेख प्रणाली, एक फळ, सॅनिटायझर, वॉटर सॅनिटायझर सिस्टम आणि अँटी-मायक्रोबियल एअर सॅनिटायझिंग सिस्टमचा समावेश आहे.
सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कर्नाटक इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी सोसायटी (केआयटीएस) च्या पुढाकाराने बेंगळूर बायोइनोव्हेशन सेंटर (बीबीसी) येथे विविध स्टार्टअप्सद्वारे ही उत्पादने विकसित केली गेली आहेत.
अश्वनाथनारायण यांनी कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी उपाय म्हणून कर्नाटक हे अग्रगण्य राज्य म्हणून उदयास आले आहे. असे मत त्यांनी या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.