बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी कोरोना उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणार्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत, भाजपाप्रणित राज्य सरकारच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेस सातत्याने संरक्षण उपकरणे खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करत आहे.
गुरुवारी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोविड आपत्तीकालीन निधीत गैरव्यवहार झाल्याचे ट्विट करीत भाजप राज्यसरकारची न्ययालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. “@CMofKarnataka आणि त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची किंमत २,००० कोटींपेक्षा जास्त आहे. साथीच्या आजाराच्या वेळी अमानुष कृत्य केले आहे, ”असे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट केले आहे.
सिद्धरामय्या यांनी “उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी न्यायालयीन चौकशी केली पाहिजे आणि विधानसभेत यावर चर्चा व्हायला हवी.” अशीही मागणी केली आहे.