बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्याचे माजी महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक टी. श्रीनिवासुलू यांचे गुरुवारी त्यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. आजारी पडल्यानंतर त्यांना बेंगळूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मूळचे आंध्र प्रदेशातील कर्णूळचे रहिवासी असलेले श्रीनिवासुलू हे १९६४ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी एस.एम. कृष्णा यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सुरक्षा सल्लागार म्हणूनही काम पाहिले होते.