बेंगळूर/प्रतिनिधी
गुरुवारी कोरोनाने पुन्हा राज्यातील सर्व विक्रम मोडले. राज्यात ६,८०५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. कर्नाटकात आता पर्यंत एका दिवसात अर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. यासह, एकूण संक्रमित रुग्णांची संख्या १,५८,२५४ वर पोहोचली आहे. यापैकी, ७५,०६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ८०,२८१ रुग्णांनी कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे. त्यापैकी ५,६०२ रूग्णांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाने गुरुवारी आणखी ९३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत २,८९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आयसीयूमध्ये ६७१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
६,८०५ नवीन रूग्णांपैकी २,५४४ रुग्ण बेंगळूर शहरातील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी रुग्णालयातून २,९७२ हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण ६७,४२५ रुग्णांपैकी ३२,३१४ रूग्णांवर उपचार सुरू असून ३३,९३२ रुग्ण आता पर्यंत बरे झाले आहेत. तर एकूण ११७८ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.