बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्य सरकारने २५ जुलैपासून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा आणि उपासनास्थळांशी संबंधित तसेच उद्याने उघडण्याची परवानगी दिली आहे. संबंधित विभागाने यासंदर्भात आदेश जरी केला आहे. तथापि, वार्षिक उत्सव, मंदिर उत्सव, मिरवणुका यांना परवानगी नाही, असे सरकारने शनिवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शनाखाली कोरोना मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करत करमणूक उद्याने व तत्सम जागा पुन्हा उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
“तथापि, जलतरण तलाव आणि पाण्याशी संबंधित साहसी उपक्रमांना परवानगी नाही,” असे महसूल विभागाचे प्रधान सचिव एन. मंजुनाथ प्रसाद आणि आपत्ती व्यवस्थापन, राज्य कार्यकारी समितीचे सचिव यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने सर्व दुकाने, आस्थापने आणि सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी दिली होती.