बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले की, केंद्राने ऑगस्टमध्ये कर्नाटकला एक कोटी लसी देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची येथे भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री बोम्माई यांनी पत्रकारांना सांगितले की, सप्टेंबरपासून केंद्र राज्याला पुरेशा प्रमाणात लस पुरवण्यास तयार आहे.
तसेच कोरोना महामारी हाताळण्यासाठी अधिक उपकरणे पुरवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्राला केली. ते म्हणाले की त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उचललेल्या पावलांविषयी त्यांना माहिती दिली आहे. तसेच “मांडवीय हे केंद्रीय खत मंत्री असल्याने खरीप हंगामात खतांचा पुरेसा पुरवठा करण्याची मी त्यांना विनंती केली,” असे बोम्माई म्हणाले.