बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकाला गुरुवारी मोठा दिलासा मिळाला. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये शून्य किंवा दहापेक्षा कमी नवीन कोरोना रुग्ण सापडले. कोरोना संसर्गाची १,२१३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचवेळी, राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे शून्य किंवा दहापेक्षा कमी होती. बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३१९ नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात २६९ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
दरम्यान, गुरुवारी राज्यातील १,२०६ रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याचबरोबर राज्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाला. गुरुवारी, कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १९,३०० वर पोहोचली आहे.
राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये, म्हैसूरमध्ये ९८ नवीन संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. उडुपीमध्ये ११३, कोडगू जिल्ह्यात ६५, चिकमंगळूर जिल्ह्यात २१, चामराजनगरमध्ये ११, हसन जिल्ह्यात ९०, बेळगावमध्ये ३९, नवीन रुग्णांची पुष्टी झाली आहे.
तसेच कोलारमध्ये १५, मंड्यामध्ये २७, शिवमोगामध्ये ४४, तुमकूरमध्ये १९, उत्तरा कन्नड जिल्ह्यात १८, कोरोनाच्या कचाट्यात आले आहेत. राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट गुरुवारी ०. ६४ टक्के होता.