सांगली / प्रतिनिधी
कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव येथे कर्नाटकात तुमकुर येथून आलेल्या दोघांना मिरजेच्या आयसोलेशन वार्डात दाखल केले आहे. सदरच्या दोन्ही व्यक्ती कर्नाटकातील तुमकुर येथे पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. त्यांच्यावर 14 दिवसाचा उपचार झाला आहे. त्यांचा तिथे पहिला अहवाल निगेटिव आल्यावर डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते बोरगाव येथे आले आहेत, परंतु त्यांचा दुसरा अहवाल पॉझिटिव आल्याची माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली, त्यामुळे या दोघांना पुन्हा एकदा मिरजेच्या आयसोलेशन वार्डात दाखल केले असून त्यांचा पुन्हा स्वॅब घेतला जाणार आहे या स्वॅबचा अहवाल आल्यानंतर याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी सांगितले.