बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्याला शुक्रवारी १२१० नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली. तर यशस्वी उपचारानंतर १८०७ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय, तर १६रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या तीन दिवसांत राज्यात १०१०१ रुग्ण बरे झाले आहेत. आता राज्यात १८,५९६ रूग्णांवर उपचार सुरू असून यातील २५३ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ८,९९,०११ वर पोहोचली आहे. तर यापैकी ८,६८,४७१ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. राज्यात कोरोनमुळे आतापर्यंत एकूण ११,९२८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १६ जण शुक्रवारी मृत्यू पावले आहेत.
आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४ तासांत १३,५०८ जलद प्रतिजैविक आणि ८७,३३८ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण १००८४६० नमुन्यांची तपासणी केली.
दरम्यान शुक्रवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ६५९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ३,७७,२५१ वर पोहोचली आहे. यापैकी ३,५९,८०१ रुग्णांनी कोरोनाला पराभूत केलं आहे. जिल्ह्यात सध्या १३,२२५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आतापर्यंत ४,२२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.