बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत वारंवार घट होत आहे. राज्यात १५ मे पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ६,०५,४९४ लाख पेक्षा जास्त होती. आता १२ दिवसांनंतर, गुरुवारी ती संख्या ४,०२,२०३ इतकी आहे. राज्यात सकारात्मकता दरही १७.५९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तथापि, मृतांचा आकडा अद्याप चिंतेचा विषय आहे. राज्यात मृत्यूचे प्रमाण १.०८ टक्के आहे आणि पुनर्प्राप्तीचा दर ८२.९७ टक्के आहे.
राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावल्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. दरम्यान , गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २४,२१४ नवीन रुग्ण आढळले तर ३१,४५९ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५,२३,९९८ वर पोहोचली आहे. यापैकी २०,९४,३६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात कोरोनाने एकूण २७,४०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४७६ रुग्णांचा मृत्यू गुरुवारी झाला आहे. राज्यातील मृत्यूचे प्रमाण २.५८ वरून १.९६ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.