बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत कधी वाढ होत आहे तर कधी घट होत आहे. मृतांची संख्याही कमी होत आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,२५९ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. याच वेळी १,७०१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहे. तर कोरोनामुळे २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यातील कोविड मृत्यू कमी होत आहेत आणि ऑगस्टमध्ये सरासरी दैनंदिन मृत्यूचे प्रमाण १९ आठवड्यांमधील सर्वात कमी आहे. २३ ऑगस्टपर्यंत कर्नाटकात ३७,१५५ मृत्यू झाले, ज्यात या महिन्यात ६३० जणांचा समावेश आहे. जुलैमध्ये१,४८५ जूनमध्ये ५,९५० आणि मेमध्ये १३,५६७ जणांचा मृत्यू झाला आहे.