बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गेल्या २४ तासात कर्नाटकात १,८०५ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सुमारे ५० टक्के रुग्ण फक्त दोन जिल्ह्यांमध्ये आहेत. राज्यात शुक्रवारी १,८५४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर या काळात कोरोनामुळे ३६ जणांचा बळी गेला आहे.दरम्यान, राज्यात सध्या कोरोना सक्रिय प्रकरणे वाढून २४,३२८ झाली आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या २९,१५,३१७ वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्या ३६,७४१ इतकी आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.
दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यात ४११ कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. तसेच दक्षिण कन्नड जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शुक्रवारी येथे ४११ रुग्णांची पुष्टी झाली आहे.