बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. राज्यात नव्याने कोरोनाचे २७३८ रुग्ण सापडले आहेत. सोमवारी बंगळूरमध्ये १३१५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
राज्यांमध्ये कोरोनाची एकूण संख्या ४१५८१ वर पोहचली आहे. गेल्या २४ तासात राज्यात बेंगळुरूमध्ये ४७ जणांसह ७३ लोक मृत्युमुखी पडले. दररोजच्या आकडेवारीमध्ये राज्य आणि राजधानीमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक होती. सोमवारी दिवसभरात तामिळनाडू (६६) आणि चेन्नई (२) यांच्या तुलनेत कर्नाटक आणि बेंगळुरूमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. बेंगळूरमध्येही चेन्नई (११४०) पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली.