बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत कमी जास्त वाढ होत आहे. राज्यात गेल्या तासात १,८२६ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. याच दिवशी १,६१८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर ३३ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत २९,२२,८७५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी २८,६३,११७ रुग्ण यशस्वी उपचारांनंतर रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर ३६,८८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.
राज्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यात बुधवारीही नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. राज्यात सर्वाधिक दक्षिण कन्नड जिल्ह्यात दैनंदिन प्रकरणे नोंदली जात आहेत. बुधवारी, सीमावर्ती जिल्ह्यात ४२२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.