बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १ लाखापेक्षा कमी आहे. राज्यात मंगळवारी ३,२२२ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर १४,७२४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. राज्यात मंगळवारी ९३ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मंगळवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण २.५४ टक्के होते.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ७५३ रुग्ण आढळले. तर याचवेळी १०,७२२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात १६ रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,४०,४२८ वर पोहोचली आहे. तर यापैकी २७,१९,४७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३४,९२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ८५,९९७ इतकी आहे.