बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्याचा कोरोना पॉझिटिव्ह दरही कमी होत आहे. मंगळवारी राज्यात ५,०४१ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्याच वेळी, १४,७८५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तसेच ११५ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात सध्या कोरोना रुग्णांची एकूण सक्रिय प्रकरणे १,६२,२८२ इतकी आहेत. राज्यात मंगळवारी कोरोना सकारात्मकतेचा दर ३.८० टक्के होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी ९८५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर, २,८१८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात १६ कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे.