बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने मराठा समाजासाठी विकास महामंडळ आणि वीरशैव लिंगायत समुदायासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आहे. दरम्यान या निर्णयानंतर राज्यातील अनेक समाजातील मठांचे प्रमुख आणि राजकारणी आपल्या समाजासाठीही स्वतंत्र महामंडळ स्थापना करण्याची मागणी करत आहेत.
भाजपा नेते आणि माजी मंत्री मलिकय्या गुट्टादार यांनी इडिगा समाजासाठी विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओ संदेशातत्यांनी इडिगा समाजातील बहुतेक लोक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागास असल्यामुळे समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर आहेत.
या समुदायाबरोबर सामाजिक न्याय करण्यासाठी विकास महामंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. व्होकलीगा समाजासाठी विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी- यापूर्वी वोकलिंगा समाजासाठी विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केली आहे. या मागणीला पाठिंबा दर्शविणारे वोकलिंगा समुदायातील अनेक मंत्री आणि भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. यासह कर्नाटक राज्य टिगलर समुदायानेही विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. मठांचे प्रमुख व प्रत्येक समुदायाचे नेते समुदायासाठी स्वतंत्र कॉर्पोरेशन स्थापन करावे या मागणीसाठी आग्रही आहेत.
कुरुबा समुदायाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी होत आहे. कुरुबा समुदायाच्या कागिनेळे मठाच्या प्रमुखांसह या समुदायाच्या अनेक नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली आणि या समुदायाला अनुसूचित जमातीच्या समुदायात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. गृहमंत्री बसवराज बोम्माई, गृहनिर्माणमंत्री व्ही. सोमण्णा, विधान परिषद सदस्य ए.एच. विश्वनाथ, एम.बी.टी. नागराज, आर.शंकर आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य एच.एम. रेवण्णा उपस्थित होते.