बेंगळूर/प्रतिनिधी
शेतकरी व इतर संघटनांनी कर्नाटक भूमी सुधारण विधेयकाविरोधात आंदोलन सुरू ठेवले आहे. भाजप सरकारने जेडीएसच्या मदतीने भूमी सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर केले.
दरम्यान कर्नाटक राज्य रायत संघाचे अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेकर,ऐक्य होराट, कामगार, दलित गटातील सदस्य आणि शेतकऱ्यांनी बेंगळुरूमध्ये राजभवनच्या दिशेने मोर्चा घेऊन गेले.
विधान सौध, शेषाद्री रस्ता, स्वातंत्र्य उद्यान, मौर्य सर्कल व आजूबाजूची रहदारी ठप्प होती. मोर्चामुळे शहराच्या विविध भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मंगळवारी कर्नाटकमधील भाजप सरकारने जद (एस) च्या पाठिंब्याने राज्य विधानपरिषदेत जमीन मालकी सुधारणांचे विधेयक मंजूर केले. परंतु कॉंग्रेसने या विधेयकाविरोधात मत नोंदवित विरोध केला.
कर्नाटक लँड रिफॉर्म्स (दुरुस्ती) विधेयक, २०२० पूर्वी विधानसभेमध्ये मंजूर झाले होते. परंतु विधान परिषदेत हे विधेयक रखडले होते. या विधेयकात कर्नाटक भूमी सुधार अधिनियम १९६१ कलम ७९ अ, बी आणि सी हटविण्याचा विचार केला गेला, ज्यामुळे केवळ शेतकर्यांना आणि वर्षाकाठी दोन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या शेतजमिनींच्या खरेदीवर मर्यादा आल्या आहेत.